भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्नानविधि केलियां भक्तीं । नाममंत्राचिया आवृत्ति

snanavidhi keliyan bhaktin | namamantrachiya avrutti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
स्नानविधि केलियां भक्तीं । नाममंत्राचिया आवृत्ति । मग प्रत्यक्ष पूजिली मूर्ति । विठोबची ॥१॥ धन्य धन्य तो देव ज्ञान । राजा निवृत्ति निधान । विठोजी आपण । भक्तां साह्ये ॥२॥ मग सकळहि भक्तमेळीं । सहित वनमाळी । बैसले तये पाळीं । इंद्रायणीचे ॥३॥ एकीं केलें स्तुतिस्तोत्रें । एक जपाताती नाममंत्रें । एक गाताती वेदस्तोत्रें । विठोबासी ॥४॥ तंव पुढारा जाला नारा । तो नामयाचा पुत्र सैरा । तो पुसतसे विचारा । नामयासी ॥५॥ ये संतभेमाजीं । राऊळ बैसले असे सहजीं । यातें पुसि जो कां जी । कवण क्षेत्र म्हणोनी ॥६॥ उठिला नामा प्रेमें डुले । वंदिलीं विठ्ठल पाउलें । मग करद्वयें जोडुनि बोले । साशंकित ॥७॥ नामा म्हणे पूर्णब्रह्म । तें कैसें सभासदीं मन । तें बोलतसे परम । ज्ञानदेवा भाग्यें ॥८॥