भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोनियाचीं झाडें अनेक कर्दळी । त्यांत रानकेळी फोंफावल्या

soniyachin jhaden anek kardali | tyant ranakeli phomphavalya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सोनियाचीं झाडें अनेक कर्दळी । त्यांत रानकेळी फोंफावल्या ॥१॥ सिताफळी भरित अवघी तापीथडी । दाट दिसती गाढी रामफळें ॥२॥ तापीतीरीं ऋषि आणि शारंगधर । पाठीमागें भार वैष्णवांचे ॥३॥ धन्य महत्‌‍नगर धन्य सोमेश्वर । धन्य तापीतीर योगियांचें ॥४॥ उष्णकाळीं छाया आवडती फार । म्हणती ऋषीश्वर रम्य स्थळ ॥५॥ नामा म्हणे देवा रंगलें अंतःकरण । उतरती विमानें गंधर्वांची ॥६॥