भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोडोनियां गळा मुक्त केले त्यांसी । पिऊनि उदकासी आली पुढती

sodoniyan gala mukta kele tyansi | piuni udakasi ali pudhati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सोडोनियां गळा मुक्त केले त्यांसी । पिऊनि उदकासी आली पुढती ॥१॥ क्षुधेलासी फार न लावीं उशीर । घेऊनिय़ां शस्त्र हाणी वेगें ॥२॥ घर तुझें दूर वाहावेना भार । आह्मी तेथ-वर येत असों ॥३॥ सत्यत्व देखोनि ह्मणतसे पारधी । तुम्ह्यांसी न वधीं जावें आतां ॥४॥ पाठोपाठी त्याच्या घरालागीं आली । वरणीं घातली मिठी त्यांनीं ॥५॥ नामा ह्मणे सत्त्व आगळें तयांचें । वर्णावया वाचे नये शेषा ॥६॥