भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोंवळीं पिळूनि कां घालिशी । मुद्रेनें आंग कां जा-ळिशी

sonvalin piluni kan ghalishi | mudrenen ang kan ja-lishi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सोंवळीं पिळूनि कां घालिशी । मुद्रेनें आंग कां जा-ळिशी ॥१॥ कासया केली खोडी । काया विटंबिली बापुडी ॥२॥ कावळा प्रात:स्नान करी । जितें मेलें तें न विचारी ॥३॥ मैदें लावूनि द्बादश टिळे । तो फांसा घालूनि निवटी गळे ॥४॥ सुसरी गंगे रहिवासु । बहुतां जीवांते करी ग्रासु ॥५॥ गंगे गेल्य ज्ञान सांगे । मांजर मारिलें तें न सांगे ॥६॥ बक ध्यान लावूनि टाळी । मौन धरूनियां मासा गिळी ॥७॥ नामा ह्मणे केशिराजा । ऐशिया जीवा लावी वोजा ॥८॥