भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोपानदेवें ग्रंथ केला होता सार । ठेविला समोर निवृत्तीच्या

sopanadeven granth kela hota sar | thevila samor nivruttichya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सोपानदेवें ग्रंथ केला होता सार । ठेविला समोर निवृत्तीच्या ॥१॥ सवें मुक्ताबाई सद्‌गुरु निवृत्ति । लक्ष्मीचा पति घेतलिया ॥२॥ जयजयकार ध्वनि होताती अपार । जाती योगेश्वर समाधीसी ॥३॥ राही रखुमाई निळकंठ जवळी । समाधिच्या पाळी अवघे जण ॥४॥ समाधि पायरीवरी वटेश्वर सोपान । मागितला मान पांडूरंगा ॥५॥ प्रतिवर्षी भेटी देऊं उभयतां । आळंकापुरीं जातां उत्सवासी ॥६॥ नामा म्हणे देवा कृपा केली फार । दिधला कीं वर भक्तराज ॥७॥