भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

देवकी म्हणे वसुदेवासी । वेगीं बाळके न्यावें गोकुळासी । घवघवीत तेजोराशी । देखे श्रीकृष्ण ॥१॥ पूर्ण प्रकाश निजतेजें । पाहतां न दिसें दुजें । तेथें कैंचे माझें तुझें । लपणें छपणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवकी वसूदेवाकडे पाहे । तंव तो स्वानंदे गर्जताहे । येरी धावोनि धरी पाये । उगे रहा ॥१॥ जळो जळो हे तुमची बुद्धी । सरली संसारशुद्धी । कृष्ण लपवा त्रिशुद्धी । जग प्रगट न करावा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवतांचे अंगीं असतां विपरित । परी संतकृपा त्वरित करिती जगीं ॥१॥ जैसी भक्ति देखती तैसे ते पावती । परी संतांची गती विचित्रची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवरे देवरे मोरी घागरीया लालसे । मैं बोलुंगी जशोदा मायछें ॥१॥ हाम रहीन दसे नामछे । तारी भीद नहीं मारो कामछे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवा तुम्ही आहांत समर्थ । काय मागूं मी पदार्थ ॥१॥ देणे द्याला तरी हेंचि द्यावें । संतचरंण मी वंदावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवा माझे मन लागों तुझें चरणी । संसारव्यसनीं पडों नेदी ॥१॥ नामस्मरण घडो संतसमागम । वाउगाची भ्रम नको देवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवाचे ते आप्त जाणावे ते संत । त्यांचे चरणीं रत व्हावें सर्वदा ॥१॥ श्रीहरीची भेटी सहजची होय । श्रमलीया जाय क्षणमात्रें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवाचे सोईरे संत रे जाणावें । यापरतें जीवें नाठवी कोणा ॥१॥ पडतां संकट आठवितसे संतां । त्याहुनी वारिता नाहीं दुजा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवांचें हें गूज सकळ मंत्रमय । जें कां निजध्येय शंकराचें ॥१॥ तें हें रामनाम सेविती सर्वभावें । रामरुप व्हावें निश्चयेंसीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवातळींचें वस्त्र तें म्हणती अपवित्र । उदके भिजविलें तें जालें पवित्र ॥१॥ देवापरीस जळ सबळ केलें । ज्ञान तें दुर्बळ होऊनीं ठेलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवासी आवडे भक्तसमागम । त्यांचें सर्व काम करी अंगें ॥१॥ भक्ताकाजालागीं अवतार धरी । नांदे भक्तांघरीं स्वयें देव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवासी कांहीं नेसणें नसे । जेथें तेथें देव उघडांची दिसे ॥१॥ देव निलाजरा देव निलाजरा । देव निलाजरा पाहा तुम्हीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवासी तुष्टण्या एक युक्ति आहे । रामनाम गाय मुखीं सदा ॥१॥ काया वाचा मनें संतासींशरण । तेणें नारायण तुष्ट होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ