भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाचे ते आप्त जाणावे ते संत । त्यांचे चरणीं रत व्हावें सर्वदा

devache te apta janave te sant | tyanche charanin rat vhaven sarvada

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवाचे ते आप्त जाणावे ते संत । त्यांचे चरणीं रत व्हावें सर्वदा ॥१॥ श्रीहरीची भेटी सहजची होय । श्रमलीया जाय क्षणमात्रें ॥२॥ पापाचे पर्वत भस्म नामाग्रीतं । अभक्ता न कळें हित नाम न घेती ॥३॥ एका जनार्दनीं संताचिया कृपें । नाम होय सोपें त्याच्या ॥४॥