भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा परिस उदार । भक्त जाणा निर्धार

deva paris udar | bhakta jana nirdhar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवा परिस उदार । भक्त जाणा निर्धार ॥१॥ याजसाठीं धावें पाठीं । देत लंगोटीं आपुली ॥२॥ आपण दिगंबरची असे । भक्त वस्त्र भूषणें सौरसें ॥३॥ म्हणोनि भक्ताचा अंकित । एका जनार्दनीं तिष्ठत ॥४॥