भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाचें तें ध्यान । आठवावें रात्रदिन

devachen ten dhyan | athavaven ratradin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवाचें तें ध्यान । आठवावें रात्रदिन ॥१॥ मुगुट कुंडलें मेखळा । कांसे शोभे सोनसळा ॥२॥ शंख चक्र गदा पद्म । सदा उदार मेघःश्याम ॥३॥ ऐसा हृदयीं आठवा । एका जनार्दनीं सांठवा ॥४॥