भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवतांचे अंगीं असतां विपरित । परी संतकृपा त्वरित करिती जगीं

devatanche angin asatan viparit | pari santakrupa tvarit kariti jagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवतांचे अंगीं असतां विपरित । परी संतकृपा त्वरित करिती जगीं ॥१॥ जैसी भक्ति देखती तैसे ते पावती । परी संतांची गती विचित्रची ॥२॥ वादक निंदक भेदक न पाहाती । एकरुप चिंतीं मन ज्यांचें ॥३॥ भक्ति केल्या देव तुष्टे सर्वकाळ । न करितां खळ म्हणवी येर ॥४॥ संतांचे तों ठायीं ही भावना नाहीं । एका जनार्दनीं पायीं विनटला ॥५॥