भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

देहीं कैंचे सुख कैंचें दुःख । कैंचा बंध कैंचा मोक्ष ॥१॥ देहीं कोण देव कोण । भक्त कोण शांत कोण अशांत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देही धर्म विहित करी । अद्वैत भाव चित्तीं धरी । सर्वभावे नमस्कारी । एक आत्मा म्हणोनी ॥१॥ तेणें तुटे रे बंधन । वाचे जपे जनार्दन । आणिक नको रे साधन । रामकृष्ण स्मर सुखें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहीं न धरी जो आशा । चित्त पंढरीनिवासा । स्मरणाचा ठसा । रात्रंदिवस जयातें ॥१॥ तोचि होय हरीचा दास । तेणें पुरती सर्व सायास । नाहीं आशापाश । चिंतनावाचुनी सर्वथा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहीं वाढें जों जों शांती । तों तों विरक्ति बाणें अंगीं ॥१॥ ऐसा आहे अनुभव । देहीं देव प्रकाशे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहीं शत्रु वसती दुर देशीं । येतां बहु दिवस लागती तयांसी ॥१॥ बाह्म शत्रुंचें अल्प दुःख । मनःशत्रुंचें वर्म अशेख ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहींच देहीं बिंबला देवी । न कळेचि पामरा पडिला संदेहो ॥१॥ आहे नाहीं संशयबुद्धी । तेणें ते गुंतलें कर्माचे सिद्धि ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहींची वासना अद्वैत निमालें । साधन साधिलें तोचि धन्य ॥१॥ द्वैताचा भाव अद्वैताचा ठाव । आठवा स्वयमेव नेणें कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहींचे आयुष्य पूर्ण तें भरलें । मग नाहीं उरलें मागील कांहीं ॥१॥ देहीं देह आहे तोवरीं अहतां । निमाचिया तत्त्वतां वाव सर्व ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दोघें शरणागत आले श्रीरामासी । मारिलें वालीसी एका बाणें ॥१॥ बाणलीसे भक्ति अंगदाचे अंगी । श्रीरामें वोसंगीं धरियेले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दोरा अंगीं जैसा नसतां सर्प दिसे । मिथ्या देह तैसा वस्तूवरी आभासे ॥१॥ देह मी नव्हे देह मी नव्हे । देह मी नव्हे माझेनी अनुभवें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दोषी पापराशी नामाचे धारक । होतां तिन्हीं लोक वंदिती माथां ॥१॥ नामाचें महिमान नामांचे महिमान । नामाचे महिमान शिव जाणे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दोषी यमदुत नेतसे बांधोनी । तंव अवचित नाम पडलें कानीं ॥१॥ तुटलें बंधन खुंटलें पतन । नाम जनार्दन ऐकतांची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

द्रव्य घेऊनियां उपदेश देती । मार्जार ते होती जन्मोजन्मीं ॥१॥ द्रव्य घेऊनियां तीर्थयात्रा करिती । श्वान ते होती जन्मोजन्मीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

द्रव्य घेऊनियां कथा जे करिती । उभयतां जाती नरकामध्यें ॥१॥ तयांचियां दोषां नाहीं परिहार । वेदाचा विचार कुंठितची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ