भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्रव्याचिया आशें । कथा करणें सायासे

dravyachiya ashen | katha karanen sayase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
द्रव्याचिया आशें । कथा करणें सायासे ॥१॥ उभयंता नरका जोडी । मेळविलीं तीं बापुडीं ॥२॥ निराश करुनी मन । करा कथा तें कीर्तन ॥३॥ देवा आवड भक्तीची । एका जनार्दनीं साची ॥४॥