भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहींचे आयुष्य पूर्ण तें भरलें । मग नाहीं उरलें मागील कांहीं

dehinche ayushya purna ten bharalen | mag nahin uralen magil kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहींचे आयुष्य पूर्ण तें भरलें । मग नाहीं उरलें मागील कांहीं ॥१॥ देहीं देह आहे तोवरीं अहतां । निमाचिया तत्त्वतां वाव सर्व ॥२॥ देहीं देहपण मी मी माझें म्हणे । मिथ्या सर्व जाणे देहांअंतीं ॥३॥ एका जनार्दनीं मिथ्या देह आहे । रामनाम बा हे सबराभरीत ॥४॥