भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहो जैं पासुनी झाला । तैं पासुनी मृत्यु लागला

deho jain pasuni jhala | tain pasuni mrutyu lagala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहो जैं पासुनी झाला । तैं पासुनी मृत्यु लागला ॥१॥ साप बेडुकातें गिळी । बेडुक मुखें माशी कवळी ॥२॥ ऐसा काळ गिळितो जना । न कळेचि बुद्धिहीना ॥३॥ मरण जाणतो बापुडीं । धरिती प्रपंचीं आवडी ॥४॥ ऐसे पामर आत्मघाती । यासी महा होये फजिती ॥५॥ असा जनीं जनार्दन । एका जनार्दनीं शरण ॥६॥