भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोषी यमदुत नेतसे बांधोनी । तंव अवचित नाम पडलें कानीं

doshi yamadut netase bandhoni | tanv avachit nam padalen kanin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दोषी यमदुत नेतसे बांधोनी । तंव अवचित नाम पडलें कानीं ॥१॥ तुटलें बंधन खुंटलें पतन । नाम जनार्दन ऐकतांची ॥२॥ तुटोनि बंधन पडता तळीं । तंव वरचेवर झेली वनमाळी ॥३॥ दुती अति दृढ नाम धरितां मनीं । यमदूतां देवदूत घालिती विमानीं ॥४॥ दोषी आणि दूता नामाचा परिपाठीं । भावबळें देव स्थापी वैकुंठी ॥५॥ एका जनार्दनीं नामोच्चारासाठीं । यमे यमदूतां नोहे भेटीं ॥६॥