भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहीं न धरी जो आशा । चित्त पंढरीनिवासा । स्मरणाचा ठसा । रात्रंदिवस जयातें

dehin na dhari jo asha | chitta pandharinivasa | smaranacha thasa | ratrandivas jayaten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहीं न धरी जो आशा । चित्त पंढरीनिवासा । स्मरणाचा ठसा । रात्रंदिवस जयातें ॥१॥ तोचि होय हरीचा दास । तेणें पुरती सर्व सायास । नाहीं आशापाश । चिंतनावाचुनी सर्वथा ॥२॥ ध्यानीं मनींनारायण । सदा सर्वदा हें चिंतन । एका जनार्दन मन । जडलेंसे हरिपायीं ॥३॥