भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा माझे मन लागों तुझें चरणी । संसारव्यसनीं पडों नेदी

deva majhe man lagon tujhen charani | sansaravyasanin padon nedi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवा माझे मन लागों तुझें चरणी । संसारव्यसनीं पडों नेदी ॥१॥ नामस्मरण घडो संतसमागम । वाउगाची भ्रम नको देवा ॥२॥ पायीं तीर्थायात्रा मुखीं राम नाम । हाचि माझा नेम सिद्धि नेई ॥३॥ आणिक मागणें नाहीं नाहीं देवा । एका जनार्दनीं सेवा दृढ देई ॥४॥