भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवपूजे ठेवितां भावो । तो स्वयेंचि जाला देवो

devapuje thevitan bhavo | to svayenchi jala devo

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवपूजे ठेवितां भावो । तो स्वयेंचि जाला देवो ॥१॥ आता कैसेनी पूजुं देवा । माझी मज होतसे सेवा ॥२॥ अन्न गंध धूप दीप । तेंही माझेंचि स्वरुप ॥३॥ एका जनार्दनीं करी पूजा । तेथें पूज्य पूजकू नाहीं दुजा ॥४॥