भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

देव भक्त दोनी करिताती काला । तयांच्या सुखाला वर्णी कवण ॥१॥ धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचें । ठेवणें सदाशिवाचें खेळतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव भक्त दोन्हीं तीर्थ क्षेत्र नाम । ऐसा एक संभ्रम कोठें नाहीं ॥१॥ प्रयागादी तीर्थ पहाती पाहतां । न बैसे तत्त्वतां मन माझें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव भक्त दोन्हीं समचि सारखें । पाहातां पारिखें न दिसे दुजें ॥१॥ भक्ताचें अंगें देव असें । देवाचे हृदयीं भक्त वसें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव भक्तपणें नाहीं दुजा भाव । एकरुप ठाव दोहीं अंगीं ॥१॥ दुजेपण नाहीं दुजेपण नाहीं । दुजेपण नाहीं दोहीं अंगीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव मनुष्य सुताचें बाहुलें । बापें बोळवणा सांगातें दिलें ॥१॥ शेवट पालऊन दिसे मधु । नेसो जाय तंव अवघाचि संबंधू ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव म्हणे नाम्या जातो मी पळोनी । काढी पां धुंडोनी मजलागीं ॥१॥ ऐसें म्हणोनी देवें घातलीसे कास । निघे ह्रषीकेश पाहुनी नाम्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव म्हणे नाम्या परीस कोठें आहे । पाहूं लवलाहे दावी मज ॥१॥ हांसूनियां नामा पांडुरंगा सांगे । परीस चंद्रभागे टाकियेला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव म्हणे नाम्या व्यापार बरवा केला । दामशेटी तुला रागावती ॥१॥ जाहले आठ दिवस जाईं तूं लौकरी । द्रव्य घेउनी झडकरी यावें मागें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव म्हणे सांवत्या लपवी मजला । उशीर बहु जाहला येईल चोर ॥१॥ लपावया स्थान नसे दुजें आन । उदर फ़ाडून लपविला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव वसे पंढरीसी । येती सनकादिक ऋषी । वंदोनी पुडंलिकासी । चरण वंदिती विठ्ठलाचे ॥१॥ करीती कीर्तन गजर । नाना आद्यें परिकर । नाचती निर्धार । भाळे भोळे आवडीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव विठ्ठल तीर्थ विठ्ठल । अवघा विठ्ठल भरलासे ॥१॥ जन विठ्ठल वन विठ्ठल । जळीं स्थळीं विठ्ठल भरलासे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवकी करी चिंता । केवीं आठवा वांचे आतां । ऐसी भावाना भावितां । जिवीं तळमळ ॥१॥ तंव न दुखतांचि पोट । वेण न लगतां उद्धट । कृष्ण झाला प्रगट । स्वयें अयोनिया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवकी निज उदरीं । गर्भाजी पाहे थोरी । तंव सबाह्म अभ्यंतरीं । व्यापक श्रीकृष्ण ॥१॥ अगे हा स्वतः सिद्ध हरी । स्वयंप्रकाश करीं । मीपणा माझारी । गर्भु वाढे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ