भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

दीपकाचे ठायीं नाहीं द्वैतभाव । चोर आणि साव सारखाची ॥१॥ तैसं ब्रह्माज्ञान । सांगताती गोष्टी । अभाविका पोटीं स्थिर नोहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दीपांचें तें तेज कळिकें ग्रासिले । उदय अस्त ठेले प्रभेविण ॥१॥ लोपलीसे प्रभा तेजाचे तेजस । जाहली समरस दीपज्योती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुःखाच्या खडकीं आदळती प्राणी । परि संसाराचा मनीं वीट नये ॥१॥ कामाचिया लाटे कर्दमाचे पुरीं । बुडे तरी हाव धरी अधिकाराची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुजियाची निंदा नको रे करूं मना । चिंती या चरण संताचिया ॥१॥ होउनी उदास गाई सदा नामक । बैसोनि निष्काम एकान्तासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुजी येऊनी पुढें बोले ऐकें वो बाई । घुसळण घुसळितां डेरां फोडिला पाहीं ॥१॥ धांवुनि आलीं सासु मारितसें मजला । हांसतसे आपण तेथोनि पळाला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुजेपणें नको पाहुं सर्वाठायीं । एकरुप देहीं दिसे ॥१॥ येणें सर्व काम सुगम सोपारें । दुजेपंणे वावरे देहबुद्धी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुजेंपणें पाहे तरी देवाचे चरण । आणि तें कीर्तन वैष्णवांचें ॥१॥ कीर्तनीं नाचती हरिदास प्रेमें । दुजेपणा नेमें हारुनी जाय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुडीवरी दुडी गौळणी सातें निघाली । गौळणी गोरस म्हणों विसरली ॥१॥ गोविंदु घ्या कोनी दामोदरु घ्या गे । तंव तंव हांसती मथुरेच्या गे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुध आणिलें परगृहींहूनी । संतोष नाही माझे मनीं । श्रीहरी देईल मज लागुनी । तरीच दुध घेईन ॥१॥ पिता म्हणतां हे वचन । बाळा तूं अज्ञान । कां वर्जिलें अन्नपान । क्षुधा बहुत पीडितसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुबळ्यांसी धन । सांपडलिया नोहे जतन । अभाविकांसी नाम जाण । तैशा रीतीं ॥१॥ धनलोभीयाचे परी । जैसें चित्त धनावरी । तैसें हृदया माझारीं । नाम जप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुबार बाहुली वस्तुरूप झाली । पाहतां सोहं मेळी चिदांनंद ॥१॥ अधमात्रा स्थान नयनींच प्रमाण । मसुरेसमान हा वर्ण जेथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुरवरी वोझें वाहिलासे भार । आतां वेरझार खुंटलीसे ॥१॥ माझिया पैं मनें मानिला विश्वास । दृढभावें आस धरियेली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुर्जन तो लाथ मारी खांबावरीं । स्तंभी नरहरी प्रगटला ॥१॥ धांवूनियां हरी आडवा तो घेतिला । ह्रुदयी विदारिला हस्तनखीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुर्जनाचें संगें दुर्जन लागत । नाना विटंबीत सज्जनासी ॥१॥ दुर्जनाचें अन्न सेउनी दुर्वास । छळिलें पांडवांस निशीमाजीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ