भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

दही दुध चोरुनी दे सर्वांना । ऐसें मज सांगताती । आई मज मारुं नको । नाहीं नाहीं म्या पाहिली माती ॥१॥ तें न ऐकिलें म्हणोनि मजवर । रुसले सांगाती । बळीरामही जो भेटला । तोही माझा पक्षपाती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दानधर्म कोणान घडे सर्वथा । राम नाम घेतं सर्व जोडें ॥१॥ कर्म धर्म कांहीं न होती सांग । रामनामें पांग फिटे त्याचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दांभिकाची भक्ति । वरीवरी देहस्थिती अंतरीं तो गती । वेगळी बापा ॥१॥ नाम गाय प्रेमभरित । रडे स्फुंदे डोळे पुसीत । अंतरीचा हेत । वेगळा बापा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दामशेटी म्हणे ऐवजाचा धनी । आणिला तो मजलागुनी दावी आतां ॥१॥ वंदुनी चरण म्हणे चला आंत । जगीं हें प्रख्यात करुं नका ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दामाजीचा भाव पाहूनी श्रीहरी । अनामिका निर्धारी स्वयें जाला ॥१॥ घेऊनियां द्रव्य निघाला तो हरी । जोहार जोहार करी बादशहातें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दामोदर गावा दामोदर पहावा । दामोदर सांठवा हृदयमाजीं ॥१॥ गोपीराजी ध्यान दामोदरीं मन । चुकलें बंधन नाम घेतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दास मी होईन कामारी दासीचा । परि छंद सायासाचा नाहीं मनीं ॥१॥ गाईन तुमचएं नाम संतांचा सांगात । यापरती मात दुजी नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दासासी संकट पडतां जडभारी । धांवे नानापरी रक्षणार्थ ॥१॥ पडतां संकटीं द्रौपदी बहीण । धांवे नारायन लावलाहें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दिव्य तेज झळकती रत्नकीळा फांकती अगणीत लावण्या तेज प्रभा दिसती गे माये ॥१॥ कानडा वो सुंदर रुपडा गे । अंतरीं बाहेरीं पाहतां दिसे उघडा गे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दिसे सगुण परि निर्गुण । आगमां निगमां न कळे महिमान । परा पश्यंती खुटलीया जाण । त्यांचे न कळे शिवाजी महिमान ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

दीन म्हणोनी नाच रे कीर्तनीं । तेणें चक्रपाणी करी कृपा ॥१॥ अनाथाचा नाथ पतीतपावन । म्हणोनी कीर्तन तया गोडी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दीनाचें उपार्जन करी पोटासाठीं । म्हणे मज लंगोटी द्याहो कोण्हीं ॥१॥ घेउनी संन्यास हिंडे दारोदारी । ‘ नारायण ‘ करी पोटासाठी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ