भजनी मालिका
← भजनांकडे परत

दीनाचिया काजा । धांवे वैकुंठिचा राजा

dinachiya kaja | dhanve vaikunthicha raja

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दीनाचिया काजा । धांवे वैकुंठिचा राजा ॥१॥ तो हा हरी विटेवरी । समकर धरुनी करीं ॥२॥ भक्तां पुंडलिकां पाहें । उभारुनी दृढ बाहे ॥३॥ एका जनार्दनीं शरण । विठ्ठलनाम पतीतपावन ॥४॥