भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

दत्त माझी माता दत्त माझा पिता । बहिणी बंधु चुलता दत्त माझा ॥१॥ दत्त माझा गुरु दत्त माझा तारु । मजशीं आधारु दत्तराज ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दत्तराया करुं प्रथम नमन । द्वीतीय चरणां सदगुरुच्या ॥१॥ सदगुरुच्या चरणां करावा प्रणाम । मुखीं नित्य नाम सद जप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दत्तात्रय नाम ज्याचे नित्य मुखीं । तया समसुखीं नाहीं दुजा ॥१॥ भावें दत्त दत्त म्हणतसे वाचे । कळिकाळ त्याचे पाय वंदी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दंभ मान ही उपाधी । निरसेल आधिव्याधी । नामें जोडे सर्व सिद्धि । धन्य जगीं नाम तें ॥१॥ उच्चारितां घडघडा । माया तृष्णा पळती पुढा । ऐसा नामच पोवाडा । ब्रह्मादिकां अत्यर्क्य ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दयेचें धाम नेघे कोणाचाही श्रम । हरि वाणीं सप्रेम दृढ निजभावें ॥१॥ प्रसन्न होऊनी दीनातें पहातो । आवडी उद्धरीतो भाविकांसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दशमी व्रताचा आरंभु । दिंडी कीर्तन करा समारंभु । तेणे तो स्वयंभु । संतोष पावे ॥१॥ एकादशी जाग्रण । हरिपूजन नामकीर्तन । द्वादशी क्षीरापती जाण । वैष्णव जन सेविती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दहा अवतार घेत भक्ताचियां काजा । तो हा विटेवरी राजा पंढरीचा ॥१॥ भक्तांचें उणें न पाहे आपण । उच्छिष्ट काढी धर्माघरीं न लाजे जाण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ