भजनी मालिका
← भजनांकडे परत

दयेचें धाम नेघे कोणाचाही श्रम । हरि वाणीं सप्रेम दृढ निजभावें

dayechen dham neghe konachahi shram | hari vanin saprem drudh nijabhaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दयेचें धाम नेघे कोणाचाही श्रम । हरि वाणीं सप्रेम दृढ निजभावें ॥१॥ प्रसन्न होऊनी दीनातें पहातो । आवडी उद्धरीतो भाविकांसी ॥२॥ एका जनार्दनीं भक्तीसी भुलला । म्हणोनी वेडावला भक्तामागें ॥३॥