भजनी मालिका
← भजनांकडे परत

दत्त माझी माता दत्त माझा पिता । बहिणी बंधु चुलता दत्त माझा

datta majhi mata datta majha pita | bahini bandhu chulata datta majha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दत्त माझी माता दत्त माझा पिता । बहिणी बंधु चुलता दत्त माझा ॥१॥ दत्त माझा गुरु दत्त माझा तारु । मजशीं आधारु दत्तराज ॥२॥ दत्त माझे जन दत्त माझें मन । सोइरा सज्जन दत्त माझा ॥३॥ एका जनार्दनीं दत्त हा विसांवा । न विचारित गांवा जावें त्याच्या ॥४॥