भजनी मालिका
← भजनांकडे परत

दशमी व्रताचा आरंभु । दिंडी कीर्तन करा समारंभु । तेणे तो स्वयंभु । संतोष पावे

dashami vratacha arambhu | dindi kirtan kara samarambhu | tene to svayambhu | santosh pave

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दशमी व्रताचा आरंभु । दिंडी कीर्तन करा समारंभु । तेणे तो स्वयंभु । संतोष पावे ॥१॥ एकादशी जाग्रण । हरिपूजन नामकीर्तन । द्वादशी क्षीरापती जाण । वैष्णव जन सेविती ॥२॥ ऎसें व्रत तीन दिन । करी जो आदरें परिपूर्ण । एका जनार्दनीं बंधन । तया नाहीं सर्वथा ॥३॥