भजनी मालिका
← भजनांकडे परत

दत्त सबाह्म अंतरीं । दत्तात्रय चराचरीं

datta sabahma antarin | dattatray characharin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दत्त सबाह्म अंतरीं । दत्तात्रय चराचरीं ॥१॥ दत्तात्रय माझें मन । हरोनि नेलें मीतूंपण ॥२॥ मुळीं सिंहाद्री पर्वती । दत्तात्रयें केली वस्ती ॥३॥ भक्तां मनीं केला वास । एका जनार्दनीं विश्वास ॥४॥