भजनी मालिका
← भजनांकडे परत

दत्त माझी माय । आम्हां अनाथांची गाय

datta majhi may | amhan anathanchi gay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दत्त माझी माय । आम्हां अनाथांची गाय ॥१॥ प्रेमपान्हा पाजी वेगीं । गुरुमाउली आम्हालांगी ॥२॥ आम्हां प्रीतीची साउली । श्रीगुरु दत्तराज माउली ॥३॥ आमची जीवींची जीवलगी । आम्हांलागीं घे वोसंगीं ॥४॥ एका जनार्दनीं । दत्तराज मायबहिणी ॥५॥