भजनी मालिका
← भजनांकडे परत

दत्त ध्यावा दत्त गावा । दत्त आमुचा विसांवा

datta dhyava datta gava | datta amucha visanva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दत्त ध्यावा दत्त गावा । दत्त आमुचा विसांवा ॥१॥ दत्त अंतर्बाह्म आहे । दत्तविण कांही नोहे ॥२॥ दत्त जनीं दत्त वनीं । दत्तरुप हें अवनीं ॥३॥ दत्तरुपी लीन वृत्ती । एका जनार्दनीं विश्रांती ॥४॥