भजनी मालिका
← भजनांकडे परत

दही दुध चोरुनी दे सर्वांना । ऐसें मज सांगताती । आई मज मारुं नको । नाहीं नाहीं म्या पाहिली माती

dahi dudh choruni de sarvanna | aisen maj sangatati | ai maj marun nako | nahin nahin mya pahili mati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दही दुध चोरुनी दे सर्वांना । ऐसें मज सांगताती । आई मज मारुं नको । नाहीं नाहीं म्या पाहिली माती ॥१॥ तें न ऐकिलें म्हणोनि मजवर । रुसले सांगाती । बळीरामही जो भेटला । तोही माझा पक्षपाती ॥२॥ एका जनार्दनीं पूर्ण कृपेनें । आम्हीं भजूं दीनराती ॥३॥