भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्जन तो लाथ मारी खांबावरीं । स्तंभी नरहरी प्रगटला

durjan to lath mari khambavarin | stambhi narahari pragatala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुर्जन तो लाथ मारी खांबावरीं । स्तंभी नरहरी प्रगटला ॥१॥ धांवूनियां हरी आडवा तो घेतिला । ह्रुदयी विदारिला हस्तनखीं ॥२॥ एका जनार्दनीं भक्ताचे रक्षण । स्वयें नारायण करितसे ॥३॥