भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुःखाच्या खडकीं आदळती प्राणी । परि संसाराचा मनीं वीट नये

duhkhachya khadakin adalati prani | pari sansaracha manin vit naye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुःखाच्या खडकीं आदळती प्राणी । परि संसाराचा मनीं वीट नये ॥१॥ कामाचिया लाटे कर्दमाचे पुरीं । बुडे तरी हाव धरी अधिकाराची ॥२॥ वारितां नायके भ्रमलासे कीर । सांपडे सत्वर पारधीया ॥३॥ एका जनार्दनीं यामाचीया फांसां । पडेल तो सहसा न कळे मुढा ॥४॥