भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुडीवरी दुडी गौळणी सातें निघाली । गौळणी गोरस म्हणों विसरली

dudivari dudi gaulani saten nighali | gaulani goras mhanon visarali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुडीवरी दुडी गौळणी सातें निघाली । गौळणी गोरस म्हणों विसरली ॥१॥ गोविंदु घ्या कोनी दामोदरु घ्या गे । तंव तंव हांसती मथुरेच्या गे ॥२॥ दुडीया माझारी कान्होंबा झाला भरी । उचंबळे गोरस सांडे बाहेरी ॥३॥ एका जनार्दनी सबलस गौळणी । ब्रह्मानदु न समाये मनीं ॥४॥