भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव संत दोन्हीं एकचि मेळ । गदारोळ कीर्तनी

dev sant donhin ekachi mel | gadarol kirtani

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव संत दोन्हीं एकचि मेळ । गदारोळ कीर्तनी ॥१॥ ती हे त्रिवेण पंढरी । आहे भीवरेचे तीरीं ॥२॥ येती वारकारी ।आनंदे नाचती गजरीं ॥३॥ म्हणे जनार्दनाचा एका । पुंडलिकें दाखविला निका ॥४॥