भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव म्हणे नाम्या जातो मी पळोनी । काढी पां धुंडोनी मजलागीं

dev mhane namya jato mi paloni | kadhi pan dhundoni majalagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव म्हणे नाम्या जातो मी पळोनी । काढी पां धुंडोनी मजलागीं ॥१॥ ऐसें म्हणोनी देवें घातलीसे कास । निघे ह्रषीकेश पाहुनी नाम्या ॥२॥ क्षणीं होय गुप्त क्षणीं तो प्रगट । पाठीं लागे स्पष्ट नामदेव ॥३॥ दूर गेलिया देव माळा पुष्पें टाकी खूण । तीं तें ओळखून नामा येत ॥४॥ एका जनार्दनीं भक्ताचा कैवारी । अभिमान बोहरी करितसे ॥५॥