भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव म्हणे नाम्या परीस कोठें आहे । पाहूं लवलाहे दावी मज

dev mhane namya paris kothen ahe | pahun lavalahe davi maj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव म्हणे नाम्या परीस कोठें आहे । पाहूं लवलाहे दावी मज ॥१॥ हांसूनियां नामा पांडुरंगा सांगे । परीस चंद्रभागे टाकियेला ॥२॥ ऐसें प्रेमभरीत बोलताती दोघे । तों राजाई ती मागें त्वरें आली ॥३॥ घालूनि दंडवत देवासी आदरें । नामयासी उत्तरें बोलतसे ॥४॥ एका जनार्दनीं मागावया परीस । परिसा घरास त्वरित आला ॥५॥