भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवातळींचें वस्त्र तें म्हणती अपवित्र । उदके भिजविलें तें जालें पवित्र

devatalinchen vastra ten mhanati apavitra | udake bhijavilen ten jalen pavitra

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवातळींचें वस्त्र तें म्हणती अपवित्र । उदके भिजविलें तें जालें पवित्र ॥१॥ देवापरीस जळ सबळ केलें । ज्ञान तें दुर्बळ होऊनीं ठेलें ॥२॥ नीचाचेनी स्पर्शे देवो विटाळला । पाणीये प्रक्षाळुनी सोंवळा केला ॥३॥ एका जनार्दनीं साच नाहीं भाव । संशयची देव नाहीं केला ॥४॥