भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

कासया साधन तपाचिया हावा । पाचरितां धावो येतो लवलाही ॥१॥ ऐसा अंकिला धांवे वचनासाठीं । पहा जगजेठी भक्तकाजा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कासयासी मूढा करिती संसार । पुढें तो अघोर थोर आहे ॥१॥ बळेंचि कां रे नागवासी पाहतां । विषयभोग भोगितां दुःख बहु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कासयासी हटयोग धूम्रपान । घालुनी आसन चिंती वेगीं ॥१॥ सोपा रे मंत्र राम अक्षरें दोनी । जपतां चुके आयणी चौर्‍यांशीची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

किती किती जन्म किती किती फेरे । किती किती अघोरें भोगिताती ॥१॥ न सुटे न सुटे न सुटे बंधन । याची आठवण धरा चित्तीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

किती बोलूं किती सांगूं । नायकती त्यांचा न सरे पांगु ॥१॥ जातां न राहाती आडवाटे । मोडती काटें कर्मधर्म ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

किती वेळां जन्म किती वेळां मृत्यु । हाचि न कळे अंतु भाग्यहीना ॥१॥ जन्मोनीं संसार मानितां बरवा । परि या राघवा शरण न जाय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कीर्तन ते पूजा कीर्तन तें भक्ति । कीर्तनें होय मुक्ति सर्व जीवां ॥१॥ पातकी चांडाळ असोत भलते । कीर्तनीं सरते कलियुगी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कीर्तन श्रेष्ठ कलियुगीं सेवा । तरले पातकी ते देवा ॥१॥ वाल्हा तारिला कीर्तनीं । पावन जाला त्रिभुवनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कीर्तनाचा गजर होत आनंदाने । तंव नामा म्हणे उच्चारा नाम ॥१॥ टाळी बाहुनी होतें मुखीं वदा नाम । ऐकतां सकाम भक्त जाहले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ