भजनी मालिका
← भजनांकडे परत

किती किती जन्म किती किती फेरे । किती किती अघोरें भोगिताती

kiti kiti janma kiti kiti phere | kiti kiti aghoren bhogitati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
किती किती जन्म किती किती फेरे । किती किती अघोरें भोगिताती ॥१॥ न सुटे न सुटे न सुटे बंधन । याची आठवण धरा चित्तीं ॥२॥ किती किती विषय भोगिती वासना । यमाचे सदना जावयासी ॥३॥ एका जनार्दनीं न करी विचार । नरक तो अघोर भोगिताती ॥४॥