भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाहुनी घाली धांवा

kirtanachi avadi deva | vaikunthahuni ghali dhanva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाहुनी घाली धांवा ॥१॥ नवल वैकुंठीच नसे । तो कीर्तनीं नाचतसें ॥२॥ भाळ्याभोळ्यासाठीं । धावें त्याच्या पाठोपाठीं ॥३॥ आपुलें सुख तया द्यावें । दुःख् आपण भोगावे ॥४॥ दीनानाथ पतीतपावना । एका जनार्दनीं वचना ॥५॥