भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

कृष्णमूर्ती होय गे काळी आली सोयं गे । प्राणाचाही प्राण पाहतां सुख सांगुं काय गे ॥१॥ तुळशी माळ गळां गे कस्तुरीचा टिळा गे । आर्धांगी रुक्मिणी विंझणे वरित गोपी बाळा गे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कृष्णा कैशी खेळूं लपंडाई । अनंत लोचन तुझे पाही । तेथें लपावें कवणे ठायीं । तुझें देखणे लागलें पाहीं ॥१॥ कान्होबा पाववी आपुल्या खुणा ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

कृष्णारुपीं भाळल्या गोपिका नारी । नित्य नवा कृष्ण जीवा आवडतो भारी । पवन वेगीं चालिल्या कालिंदीतीरीं । चिदानंद भावें भोगावा श्रीहरीं ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

कृष्णालाजे ती राधिका राहे घरी । जीवनालागीं जिवें जीव भरी । कृष्णदृष्टी तो माझी नुरे उरी । यमुने जातां सन्मुख देखे हरी ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

कृष्णाविण दुजे नेणती काया वाचा । जाला पांडवांचा सहकारी ॥१॥ वारिलें संकट भक्तांचा अंकित । धांवेचि त्वरित नाम घेतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

केला उपकार जगीं तारियेले सर्व । निवृत्ति गुरु माझा जीव उध्दरिले सर्व ॥१॥ कायावाचामनें शरण निवृत्तिपायीं । देहभावें मीतूंपणा उरलाची नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

केलिया कर्मा येत असे वांटा । अभागी करंटा मतिमंद ॥१॥ जेथें राहे उभा दिसे दैन्यवाणा । चुकला भजना गोविंदाच्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

केलें तुवां काय जाऊनियां तीर्था । सर्वदां विषयार्था भुललासी ॥१॥ मनींची तीं पापें नाहीं धोवियेलीं । वृत्ति हे लाविली संसारींच ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कैं तयामागें चरण चालती । ऐशी वाटे खंती दिनराती ॥१॥ कैं या मनाची पुरेल वासना । कैं मिठी चरणा देईन जीवें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कैं मनींची इच्छा पुरेल ही धांव । पाहीन पंढरीराव जाऊनियां ॥१॥ आलीया जन्माचें होईल सार्थक । निवारेल दुःख भव पीडा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कैंचें सुख कैंचें दुःख । कैंचा बंध कैंचा मोक्ष ॥१॥ कैंचा देव कैंचा भक्त । कैंचा शांत कैंचा अशांत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कैवल्य निधान तुम्ही संतजन । काया वाच मन जडलें पायीं ॥१॥ सर्वभावें दास अंकित अंकीला । पूर्णपणें जाहला बोध देहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कैवल्याचा पुतळा । प्रगटला भूतळा । चैतन्याचा जिव्हाळा । ज्ञानोबा माझा ॥१॥ ज्ञानियाचा शिरोमणी । वंद्य जो का पूज्यस्थानीं । सकळांसी शिरोमणी । ज्ञानोबा माझा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कैवल्याची राशी वैष्णवांचे घरीं । मुक्ति भुक्ती कामारी आहे जेथें ॥१॥ तो हा विठ्ठल निधान परेपरता उभा । सांवळी ती प्रभा अंगकांती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ