भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैवल्याची राशी वैष्णवांचे घरीं । मुक्ति भुक्ती कामारी आहे जेथें

kaivalyachi rashi vaishnavanche gharin | mukti bhukti kamari ahe jethen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कैवल्याची राशी वैष्णवांचे घरीं । मुक्ति भुक्ती कामारी आहे जेथें ॥१॥ तो हा विठ्ठल निधान परेपरता उभा । सांवळी ती प्रभा अंगकांती ॥२॥ मुनिजनांचे ध्येय योगियांचें उन्मन । ज्या पैं माझें लीन चित्त्त जाहलें ॥३॥ जया आष्टांग योगां सांकडें साधित । तें उगडें पाहतां उभें विटेवरी ॥४॥ एका जनार्दनीं सगुण निर्गुण । यापरता चैतन्यघन उभा असे ॥५॥