भजनी मालिका
← भजनांकडे परत

केला उपकार जगीं तारियेले सर्व । निवृत्ति गुरु माझा जीव उध्दरिले सर्व

kela upakar jagin tariyele sarva | nivrutti guru majha jiv udhdarile sarva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
केला उपकार जगीं तारियेले सर्व । निवृत्ति गुरु माझा जीव उध्दरिले सर्व ॥१॥ कायावाचामनें शरण निवृत्तिपायीं । देहभावें मीतूंपणा उरलाची नाहीं ॥२॥ ऐसा श्रीनिवृत्ति ज्ञानदेवें धरिला चित्तीं । चांगया प्रेम दिधलें गुरु वोळखिला चित्तीं ॥३॥ एका जनार्दनीं शरण निवृत्तिप्रती । संसार नुरेचि उरी निवृत्ति म्हणतां चित्तीं ॥४॥