भजनी मालिका
← भजनांकडे परत

केलें आवाहन । जेथें नाहीं विसर्जन

kelen avahan | jethen nahin visarjan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
केलें आवाहन । जेथें नाहीं विसर्जन ॥१॥ भरला ओतप्रोत । स्वामी माझा देव दत्त ॥२॥ गातां येत नाहीं । पूर्ण सुलीनता पाही ॥३॥ एका जनार्दनीं खुण । विश्वी भरला परिपुर्ण ॥४॥