भजनी मालिका
← भजनांकडे परत

कासयासी हटयोग धूम्रपान । घालुनी आसन चिंती वेगीं

kasayasi hatayog dhumrapan | ghaluni asan chinti vegin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कासयासी हटयोग धूम्रपान । घालुनी आसन चिंती वेगीं ॥१॥ सोपा रे मंत्र राम अक्षरें दोनी । जपतां चुके आयणी चौर्‍यांशीची ॥२॥ मागें बहुतांचा उपदेश हाची । तरले रामनामेंची पातकी जन ॥३॥ एका जनार्दनीं रामनाम ख्याती । जाहलीपै विश्रांती शंकरासी ॥४॥