भजनी मालिका
← भजनांकडे परत

किती बोलूं किती सांगूं । नायकती त्यांचा न सरे पांगु

kiti bolun kiti sangun | nayakati tyancha na sare pangu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
किती बोलूं किती सांगूं । नायकती त्यांचा न सरे पांगु ॥१॥ जातां न राहाती आडवाटे । मोडती काटें कर्मधर्म ॥२॥ वाउगे पंथें असती जनीं । तसे मांडणी गुंतू नका ॥३॥ एका जनार्दनीं लडिवाळ । पूर्ण कृपाळू संतांचा ॥४॥