भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

कां रे भांबावसी नास्तिकासाठीं । कोरडी कां आटी करसी वायां ॥१॥ हें तों पोसणें आणिलें उसणें । जयाचें तया देणें अनायासें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कां रें हावभरी जाहालसी पामरा । भार वाहसी खरा प्रपंचाचा ॥१॥ नाम श्रीरामांचे नित्य घेई वाचे । तुटलें जन्माचें दुःख जाण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काकुलते गोपाळ म्हणती रे कान्हया । गाई न येती माघारी कोन बळी कासया ॥१॥ आमुची खुंटली गति आवरीं तुं हरी । तुजवांचुनी कोण रेखा आमुचा कैवारी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काचरट पाहतां कडु तें शेंद । परिपाकीं पाहतां गोडचि शुद्ध ॥१॥ कडु तेंचि गोड कडू तेंचि गोड । समरस सोयारिक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काढिली हळदुली लखलखीत सोज्वळी । जन्म ब्रह्मचळी झालें तिये ॥१॥ अति सूक्ष्म सुरंग शोभिवंत अंग । ज्यासी होय भाग्य त्यासीच लागे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काढी काढी भ्राती देहाची सर्वथा । प्रपंचाची चिंता नको तुज ॥१॥ सर्वभावें शरण विठठलासी जाई । ठायीचाचि ठायीं निवारिल ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कांतीपुरीमाजीं राजा रुक्मांगद एकनिष्ठ शुध्द पुण्य गांठीं ॥१॥ सहनशील दया मूर्तिमंत अंगी । न भंगे प्रसंगी सत्वधीर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥ कानडा विठ्ठल नामें बरवा । रुपें विठ्ठल हृदयीं ध्यावा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कानावाटें मी नयनासी आलों । शेखीं नयनाचा नयन मी जाहलों ॥१॥ दृष्टीद्वारां मी पाहे सृष्टीं । सृष्टी हरपली माझें पोटी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कान्ता ही अबला नाहीं तिसी ज्ञान । माझें वृध्दपण जाहलें आतां ॥१॥ नवस करुनी हा मागितला नामा । संसार विश्राम होईल आम्हां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कान्होबा नवल सांगतों गोष्टी । एक वृक्ष दृष्टी देखिला तयावरी सृष्टी ॥१॥ कोडें रे कोडें कान्होबा तुझें कोडें । जाणती जाणती अर्थ पाहतां उघडें ॥ध्रृ०॥

रचनाकार: संत एकनाथ

कान्होबा सांभाळी आपुली गोधनें तुझ्या भिडेनें कांहीं न म्हणे ॥१॥ तुं बैसासी कळंबाखाली । वळती देतां आमुचे पाय गेली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काम क्रोध मद मत्सर शरीरी । रात्रंदिवस निर्धारीं छळिताती ॥१॥ आशा तृष्णा भ्रांति भुली हे वासना । सदोदित मना छळिताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर । षड्‌वैरी तत्पर हेचि येथें ॥१॥ क्षुधा तृष्णा मोद शोक जरा मरण । षडऊर्मी पूर्ण देहीं हेंची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काम क्रोध लोभ नाहीं संतां अंगी । वर्तताती जगीं जगरुप ॥१॥ नातळोनी संसारा दाविती पसारा । भाव एक खरा विठ्ठलपायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ