भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांतीपुरीमाजीं राजा रुक्मांगद एकनिष्ठ शुध्द पुण्य गांठीं

kantipurimajin raja rukmangad ekanishtha shudhda punya ganthin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कांतीपुरीमाजीं राजा रुक्मांगद एकनिष्ठ शुध्द पुण्य गांठीं ॥१॥ सहनशील दया मूर्तिमंत अंगी । न भंगे प्रसंगी सत्वधीर ॥२॥ न्यायनीती राज्य पाळी ब्राम्हणासी । मूर्तिमंत धर्मासी स्थापियेले ॥३॥ दीनाचें रक्षण साधूचें पूजन । संतांचें वचन मान्य सदा ॥४॥ एका जनार्दनी साधियेला नेम । परि काहीं कर्म वोढवलें ॥५॥