भजनी मालिका
← भजनांकडे परत

कान्होबा सांभाळी आपुली गोधनें तुझ्या भिडेनें कांहीं न म्हणे

kanhoba sambhali apuli godhanen tujhya bhidenen kanhin na mhane

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कान्होबा सांभाळी आपुली गोधनें तुझ्या भिडेनें कांहीं न म्हणे ॥१॥ तुं बैसासी कळंबाखाली । वळती देतां आमुचे पाय गेली ॥२॥ तुझीं गोधनें बा अचाट । धांवती देखोनी विषय हिरवट ॥३॥ तूं बैसोनी करिसी काला । आमुच्या शिदोर्‍या करुनी गोळा ॥४॥ खातोसी दहीं भाताचा गोळा । आम्हाकदे न पहासी उचलोनी डोळा ॥५॥ वेधिलें आमुचे जीवपण । ठकविलें आम्हाकारण ॥६॥ एका जनार्दनीं परमानंद । आम्ही भुललों तुज गोविंदा ॥७॥