भजनी मालिका
← भजनांकडे परत

कामक्रोध लागले मागें । तप करुनी काय सांगें

kamakrodh lagale magen | tap karuni kay sangen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कामक्रोध लागले मागें । तप करुनी काय सांगें ॥१॥ कायसा जाशी वनांतरीं । कामक्रोध भरले अंतरीं ॥२॥ वनीं जाऊनियां चिंता । रात्रंदिवस घोकिशी कांता ॥३॥ योग अभ्यास न कळे वर्म । शिणतो मूढ धांवतें कर्म ॥४॥ कर्मे लिहलीं न चुके रेखा । म्हणे जनार्दनीं एका ॥५॥